Latest Posts

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंच्या पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांकडून अर्ज आमंत्रित

– इतर मागासवर्गीय व्यक्तींसाठी विविध कर्ज योजना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या उपकंपनी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ व संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या तिन्ही महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वागीण कल्याणाकरीता बेरोजगारांसाठी स्वयंग उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.

इतर मागासवर्गीय प्रवार्गातील गरजु व कुशल व्यावसायीक व्यक्तींना कृर्षी सलग्न व पारंपारीक उपक्रम, लघु उद्योग व मध्यग उद्योग उत्पादन, व्यापर विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसासाठी या महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रुपये १ लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना –
या योजनेत अर्जदाराचा सिबील क्रीडिट स्कोअर किमान ५०० पेक्षा जास्त असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू १ लक्ष पेक्षा कमी असावे. परतफेडीचा कालावधी ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये राहिल. नियमीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेत व्याज अदा करावे लागणार नाही परंतू थकित झालेल्या हप्त्यांवर द. सा. द. शे. ४ टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

२० टक्के बीज भांडवल कर्ज योजना –
या योजनेमध्ये ७५ टक्के रक्कम ही बँकेची असून त्यावरील व्याज हे बँकेच्या नियमाप्रमाणे राहील. २० टक्के रक्कम ही महामंडळची असून त्यावर द.सा.द.शे. ६ टक्के व्याज आकारण्यात येते व ५ टक्के सहभाग हा लाभार्थ्यांचा आहे. या योजनेची कर्ज मर्यादा रुपये ५ लाखापर्यंत असून परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा समान ६० हप्त्याचा आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना –
ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा १५ लाखा पर्यतची आहे. सदर योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. या योजनेत कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न मर्यादा ८ लक्ष पर्यंत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (१२ टक्केच्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. तसेच लाभार्थ्यांने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरू असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना –
सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा १० ते ५० लक्ष रुपये पर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. गटातील लाभार्थीचे १८ ते ४५ वर्षे असावे. तसेच गटातील लाभार्थ्यांनी यापूर्वी महामंडळाचा किंव्हा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

इतर मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षीक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचतगट, भागीदार संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत), एलएलपी, एफपीओ अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणी करीता जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बैंक प्रमाणीकरनानुसार महामंडळाकडून अदा केले जाईल.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना –
ही योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा देशातर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा १० लक्ष ते २० लक्ष रुपये पर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे १७ ते ३० वर्ष असावे. अर्जदाराची कोटोबीक वार्षीक उत्पन्न मर्यादा ८ लक्ष रुपये असावी. विद्यार्थी १२ वीत ६० टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरनानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना –
सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित साधनकेंद्र (CMRC) मार्फत राबविल्या जात आहे. इतर मागास प्रवार्गातील किमान ५० टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास प्रथम टप्यात रुपये 5 लक्ष पर्यंत कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येईल. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निकषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (१२ टक्केच्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

सदर कर्ज योजना ही बँकेमार्फत असून लाभार्थ्यांनी महामंडळाच्या वेबसाईडवर ऑनलाईन अर्ज www.msobcfdc.org या संकेत स्थळावर भरावा. सदर योजनेचा लाभा हा इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तीने जास्तीत जास्त घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने केले आहे.

Latest Posts

Don't Miss