Latest Posts

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंच्या पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांकडून अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या  वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील ३० पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांचा तसेच विशिष्ट एकल विशेषता असलेल्या १० खाटाच्या रुग्णालयांचा एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतीराव फुले  जन आरोग्य योजना यांच्या पॅनलवर समावेश करण्यात येणार आहे.

इच्छुक पात्र रुग्णालयांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.यामुळे आर्थिक दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल आणि जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यास मदत होईल. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्र सरकारची व महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना ही राज्य शासनाची योजना योजना असून योजनेंतर्गत  आर्थिकद्ष्टया कमकुवत कुटूंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार प्रदान करण्यात येते. यामध्ये १ हजार ३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांचा समावेश आहे.

पॅनलवर समावेश प्रक्रियेसाठी पात्रता निकष –
३० पेक्षा जास्त खाटा असलेले रुग्णालय किंवा नाक, कान घसा, नेत्र विकार, अस्थिव्यंग आणि पॅालिट्रॉमा, भाजणे, बालरोग शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार युनिट्स, नवजात आणि बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन युनिट्स, हिमोडायलिसिस- मुत्रपिंडशास्त्र युनिट्य अशा एकल विशेषता असलेल्या १० खाटांची रुग्णालये जी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि महाराष्ट राज्य आरोग्य हमी  सोसायटी निकषांची पुर्तता करतील ती आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतीराव फुल जन आरोग्य योजनांच्या पॅनलवर समावेशासाठी पात्र ठरतील. यामध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि उच्च दर्जाची रुग्णसेवा यांचा समावेश आहे.

पॅनलवरील रुग्णालयांमध्ये या दोन्ही योजनांतर्गत लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळतील यामुळे गंभीर आजारांवरील उपचार परवडणारे होतील. आणि रुग्णांचे आर्थिक भार कमी होईल. पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांनी https://www.jeevandayee.gov.in  या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथील ०७१५२ – २४५४४९ या दुरध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा समन्वयक किंवा जिल्हा शल्य चिकित्सक  यांच्या संपर्क साधावा, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss