विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेल्या ५ वर्षावरील व १८ वर्षापर्यंतच्या मुलांना केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. सन २०२५ करिता प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून ३१ जुलै २०२४ पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहे.
मुलाचे वय ५ वर्षापेक्षा अधिक व ३१ जुलै २०२४ रोजी १८ वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेल्या मुलांनी www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे. पुरस्काराबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून पुरस्कारसाठी प्रस्ताव स्वत: मुले किंवा त्यांच्यावतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आदी अर्ज करु शकतात, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे यांनी कळविले आहे.
