Latest Posts

पोस्टे कोरची येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण ६ लाख ८० हजार ४५० रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचे आदेशान्वये पोस्टे कोरची हद्दीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोस्टे कोरची येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये ४९ गुन्हयातील एकूण किंमत ६ लाख ८० हजार ४५० रुपयाचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल ०५ डिसेंबर २०२३ रोजी नष्ट करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने ०५ डिसेंबर २०२३ रोजी पोस्टे कोरचीचे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांनी राज्य उत्पादक शुल्क, गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक चं.वि. भगत यांच्यासह पोस्टे कोरची हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्यातील जप्त मुद्येमाल नष्ट केला, ज्यात १) देशी दारुच्या १८० मिली मापाच्या ४४९ बाटल्या २) देशी दारुच्या ९० मिली मापाच्या ४ हजार ४७ बाटल्या ३) विदेशी दारुच्या १८० मिली मापाच्या २ हजार ६०९ बाटल्या ४) ६५० मिली मापाच्या बियरच्या २०२ बाटल्या ५) ५०० मिलीच्या चियरच्या १३० टिनाचे कॅन ६) ३३० मिली मापाच्या बियरच्या ६१ बाटल्या याप्रमाणे एकूण ७ हजार ४९८ बाटल्याचा मुद्देमाल जेसीबिच्या सहाय्याने १०/१० चा खोल खड्‌डा खोदून रोड रोलरच्या सहाय्याने कड़क व मुरमाळ जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व फ्लॉस्टीकच्या बॉटलांचा गुरा करण्यात आला व काचेचा चुरा व प्लॅस्टीकच्या चेपलेल्या बाटल्या जेसीबीच्या फावड्यांच्या सहाय्याने खड्यात टाकण्यात आला. सदर मुद्यमालाची विल्हेवाट लावतांना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहील झरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कोरची येथील प्रभारी अधिकारी अमोल फडतरे, मपोउपनि, आसावरी शेडगे, परी. पोउपनि गोगेश पचार व सर्व अंमलदार यांचे उपस्थीतीत पार पडली.

Latest Posts

Don't Miss