विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी (Chamorshi) : १४ नोव्हेंबर २०२३ रोजी गडचिरोली पोलीस दलाचे वतीने पोलिस अधीक्षक निलोत्पल, देशमुख (अप्पर पो. अधीक्षक) चिंता (अपर पो. अधीक्षक प्रशासन) तारे (अपर पो. अधीक्षक अभियान) यांच्या संकल्पनेतून यंदाची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत हा उपक्रम उप विभागीय पोलिस अधिकारी हेडरी बापूराव दडस यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन गट्टा जांबिया प्रभारी अधिकारी चेतन परदेशी यांच्या वतीने दिवाळी सणाच्या निमित्याने नक्षलग्रस्त भागातील पोलिस स्टेशन गट्टा जांबिया येथे भव्य जनजागरण मेळावा तसेच भगवान बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा व विर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी अधिकारी चेतन परदेशी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडंट मोहित कुमार होते. तसेच सदर कार्यक्रमास पोउपनि जावळे, एसआरपीएफ चे पोउपनि टेकवाड, पोउपनि जाधव व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीविर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. मेळाव्या दरम्यान प्रभारी अधिकारी चेतन परदेशी यांनी आदिवासी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व प्रशिक्षणाबाबत माहिती देवून मार्गदर्शन केले तसेच नक्षल दबावाला बळी न पडता आपले जीवनमान सुधारणे बाबत आदिवासी बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच मेळाव्या दरम्यान गट्टा पोलिस स्टेशन हद्दीतील गावातील महिला, पुरुष, लहान मुलांना दिवाळी निम्मित खालीलप्रमाणे भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.
१) शेती उपयुक्त जेतपंप (पाण्याची मोटार)- ४ गावांना. (गटटा, जांबिया, गट्टागुडा, गुंडजुर) २) महिलांना साडी- १३४ ३) पुरुषांना ब्लँकेट- ८२ ४) फवारणी यंत्र- २ ५) मिठाई व फराळ लहान मुलांना- ४० पॅकेट ६) व्हॉलिबॉल- १२ ७) खेळाडूंना स्पोर्ट्स किट (t-shirt pant)- २६ तसेच भगवान बिरसा मुंडा व्हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामधे पोलीस स्टेशन हद्दीतील १२ गावातील संघांनी सहभाग घेतला. त्यामध्ये १) प्रथम पुरस्कार ₹ ३ हजार – मौजा गट्टा संघ २) द्वितीय पुरस्कार ₹ २ हजार – मौजा पुस्कोटी संघ ३) तृतीय पुरस्कार ₹ १ हजार – मौजा मोहांदी संघ. यांनी पारीतोषिक पटकावले. सहभागी प्रत्येक संघाला व्हॉलीबॉल भेट म्हणून देण्यात आले. तसेच अंतिम सामन्यातील दोन्ही संघांना स्पोर्ट्स किट (t-shirt pant) देण्यात आले.
त्याचप्रमाणे वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामधे पोलीस स्टेशन हद्दीतील १० गावातील संघांनी सहभाग घेतला. त्यामध्ये १) प्रथम पुरस्कार ₹ ३ हजार – मौजा मोडस्के संघ २) द्वितीय पुरस्कार ₹ २ हजार – मौजा जांबिया B संघ ३) तृतीय पुरस्कार ₹ १ हजार – मौजा जांबिया A संघ. यांनी पारीतोषिक पटकावले. अंतिम सामन्यातील दोन्ही संघांना स्पोर्ट्स किट ( t-shirt pant) देण्यात आले.
सदर भव्य जनजागरण मेळावा व व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धा कार्यक्रमाकरिता अती दुर्गम नक्षलग्रस्त भागातील ४५० ते ५०० नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांना जेवण व चहा पाण्याची व्यवस्था करुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा पोलिस चे सर्व अधिकारी व अमलदार तसेच SRPF, CRPF चे अधिकारी-अमलदार यांनी परिश्रम घेतले.
