– महोत्सवात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : युवकांचा सर्वागीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावण्यासाठी क्रिडा विभाग व कृषि विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त युवक व युवतींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. त्या निमित्ताने जिल्हा क्रिडा संकुल येथे २९ व ३० नोव्हेंबर या कालावधीत तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान या संकल्पनेवर आधारित युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा महोत्सवात वय १५ ते २९ वर्षा पर्यंतच्या युवकांना सहभाग नोंदविता येणार असून यासाठी महोत्सवामध्ये समुह लोकनृत्य, वैयक्तिक लोकनृत्य, लोकगीत समुह, वैयक्तिक स्पर्धेचा समावेश असणार आहे. यासाठी कलाकारांना वाद्यवृंद व साहित्य सोबत आणने आवश्यक आहे. लोकगीत व लोकनृत्य सादर करणा-या कलाकारांनी पुर्वध्वनी मुद्रीत टेप अथवा रेकाँर्डीगवर कार्यक्रम सादर करता येणार नाही. लोकगीत व लोकनृत्य चित्रपटबाह्य असावे. साथसंगत सोबत असणे आवश्यक आहे.
तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान या विषयावर कथा लेखन, फोटोग्रॉफी, पोष्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संकल्पनावर आधारीत स्पर्धा व युवा कृती या स्पर्धा राहणार आहे. महोत्सवात प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांना विभागीय महोत्सवाकरीता प्रवेश देण्यात येईल. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कृषि विद्यापिठ, युवक मंडळे, संगीत विद्यालय, स्वयंसेवी संस्थेतील युवक युवती सहभागी होऊ शकतात.
महोत्सवात सहभाग नोंदविण्यासाठी २४ नोव्हेंबर पर्यंत सहभागी कलाकारांचे नावासह प्रवेश यादी, मोबाईल क्रमांक, संस्थेचे नाव व प्रत्येकाच्या जन्मतारखेचा दाखला व रहिवासी पुराव्यासह जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यायात सहभाग नोंदवावा किंवा sport_wda@yahoo.com या ईमेल सादर करावा. अधिका माहिती व नियम अटीकरीता जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.
