Latest Posts

रोडवरुन जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकाविणाऱ्या अटट्ल जबरी चोरास रामनगर पोलीसांनी केले जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : ११ नोव्हेंबर २०२३ रोजी फिर्यादी सुनिता विजय कोकुलवार (६०) रा. बियानीनगर जवळ, छत्रपतीनगर, प्लॉट क्र. १७, विजय निवास, चंद्रपुर यांनी रामनगर पोस्टेला तक्रार दिली की, ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायकाळी ०९:०० वाजता सुमारास आपले घराचे अंगनात दिवाळी सन निमीत्याने रांगोळी टाकत असतांना अज्ञात इसम हा त्याचे तोंडाला पांढऱ्या रंगाचा दुप्पटा बांधुन फिर्यादीच्या गळ्यातील २ तोडयाचा सोन्याचा गोप ओढला असता फिर्यादीने सदरचा गोप पुढील बाजुने पकडलला असता, अज्ञात आरोपी याने जोराचा झटका देवुन गोप तुटुन त्याचा काही भाग फिर्यादीच्या हातात राहीला. तेव्हा फिर्यादीने आरडा-ओरड करण्यास सुरूवात केली तेव्हा नमूद अज्ञात आरोपी तिथुन पळुन गेला.

सदर अज्ञात आरोपीने अर्धा सोन्याचा गोप अंदाजे वजन ७-८ ग्रॅम किमत ३० हजार रू. असा जबरदस्तीने हिसकावुन नेले. अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन रामनगर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध अप.क्र. १२४८ / २०२३ कलम ३९२ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

नमुद गुन्हयाचे तपासा दरम्यान अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी गुन्हे शोध पथक येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कसोशीने तपास करुन गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन आरोपी मंगेश वसंता हिंगाने (३५) रा. गाडगेबाबा चौक, चंद्रपुर यास ताब्यात घेवुन सदर गुन्हयासंबंधाने बारकाईने विचारपुस करुन त्याचेकडुन सदर गुन्हयातील फिर्यादीचे गळ्यातील जबरदस्तीने हिसकावुन नेलेल्या सोन्याच्या गोपाचा तुकडा वजन अंदाजे ७-८ ग्रॅम कि. ३० हजार रु. जप्त केले. नमुद आरोपीकडे अधिक विचारपुस केली असता त्याने यापूर्वी १२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ०६:१५ वाजता सुमारस पोस्टे दुर्गापुर हद्दीतील ॲम्बीसिएस गॅलक्सी, सुमित्रानगर, तुकूम, चंद्रपुर येथील रोडवरून जाणाऱ्या एका महिलेल्या गळयातील १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप जबरदस्तीने हिसकावुन नेले अशी कबुली दिले वरून नमुद घटने संबंधाने पोस्टे येथे अप.क्र. २५३ / २०२३ कलम ३९२ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद आहे. नमुद दोन्ही घटनेसंबंधीत आरोपीने जबरदस्तीने हिसकावुन नेलेले सोन्याचे गोप असा एकुण ६५ हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

पोस्टे रामनगर अप.क्र. १२४८/२०२३ कलम ३९२ भादंवि
घटनास्थळ : छत्रपतीनगर, चंद्रपुर
आरोपीचे नाव : मंगेश वसंता हिंगाने (३५) रा. गाडगेबाबा चौक, चंद्रपुर
जप्त माल : सोन्याच्या गोपाचा तुकडा वजन अंदाजे ७-८ ग्रॅम कि. ३० हजार

पोस्टे दुर्गापुर अप.क्र. २५३/२०२३ कलम ३९२ भादवि
घटनास्थळ :- ॲम्बीसिएस गॅलक्सी, सुमित्रानगर, तुकूम, चंद्रपुर
आरोपीचे नाव :- मंगेश वसंता हिंगाने (३५) रा. गाडगेबाबा चौक, चंद्रपुर
जप्त माल :- सोन्याचा गोप अंदाजे वजन १० ग्रॅम किमंत अं. ३५ हजार रु.

असा एकुण ६५ हजार चा मुद्देमाल मिळुन आला.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु- उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पो.नि. लता वाढीचे आणि रामनगर पोस्टेचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Latest Posts

Don't Miss