Latest Posts

देशातील सर्वात मोठ्या फायनान्स कंपनीवर आरबीआई ची मोठी कारवाई : लोन देण्यावर बंदी, ग्राहकांवर होणार परिणाम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi delhi) : देशातील सर्वात मोठी नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) बजाज फायनान्स विरोधात रिझर्व्ह बँकेने मोठी कठोर कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने या एनबीएफसीला दोन उत्पादनांतर्गत कर्ज मंजूर करणे आणि वितरित करणे थांबवण्यास सांगितले आहे.

यामध्ये ईकॉम (eCom) आणि इंस्टा ईएमआय कार्डचा (Insta EMI Card) समावेश आहे.

नियमांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेकडून बजाज फायनान्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. बजाज फायनान्स ही मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे. दरम्यान, शुक्रवारच्या बंद किंमतीनुसार कंपनीचे मार्केट कॅप ४४६,४५६.७८ कोटी रुपये आहे आणि ती देशातील दहावी सर्वात मौल्यवान कंपनी आहे.

काय म्हटलेय रिझर्व्ह बँकेने ?
कंपनीने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल लोन मार्गदर्शक तत्त्वांच्या विद्यमान तरतुदींचे पालन न करणे, विशेषत: या दोन उत्पादनांतर्गत ग्राहकांना तथ्यांचे मुख्य तपशील जारी न करणे आणि कंपनीद्वारे मंजूर अन्य डिजिटल कर्जांच्या संदर्भात जारी केलेल्या तपशीलांतील त्रुटींमुळे ही कारवाई आवश्यक आहे. कमतरता दूर केल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून या निर्बंधांचे पुनरावलोकन केले जाईल, असे जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आलेय.

सर्वात मोठी एनबीएफसी –
बुधवारी बजाज फायनान्सचा शेअर १.८४ टक्क्यांच्या घसरणीसह ७ हजार २२३.९५ रुपयांवर बंद झाला. त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ८ हजार १९० रुपये आहे आणि नीचांकी स्तर ५ हजार ४८७.२५ रुपये आहे. बजाज फायनान्स ही मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी एनबीएफसी आहे आणि एकूण दहावी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. मार्केट कॅपमध्ये फक्त रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचयूएल, आयटीसी, भारती एअरटेल आणि एसबीआय बजाज फायनान्सच्या पुढे आहेत.

Latest Posts

Don't Miss