Latest Posts

देसाईगंज नगर परिषदेतर्फे आ. रामदास मसराम यांचे हस्ते दिव्यांगांना निधीचे वितरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : देसाईगंजनगर परिषद क्षेत्रातील दिव्यांग बांधवांकरीता दरवर्षी नगर परिषदेच्या उत्पन्नाच्या ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात येत असते व सदर निधी दरवर्षी अर्धवार्षीक स्वरुपात दिव्यांग बांधवांना वितरीत करण्यात येत असते. सन २०२४ – २०२५ या आर्थीक वर्षा नगर परिषदेमार्फत दिव्यांग बांधवांकरीता ५ टक्के निधी रुपये ५ लाख ९२ हजार – राखुन ठेवण्यात आलेले होते. या निधीअंतर्गत दिव्यांग बांधवांच्या वैद्यकिय खर्च व उदरनिर्वाहाकरीता माहे – एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीचा अर्धवार्षीक हप्त्याचे निधी यापुर्वीच करण्यात आलेला आहे.

तसेच याप्रसंगी माहे ऑक्टोंबर २०२४ ते मार्च २०२५ या अर्धवार्षीक हप्त्याचा निधी आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आ. रामदास मसराम यांचे हस्ते प्रातिनीधीक स्वरुपात धनादेशाचे वितरण करण्यात आले. सदरचा निधी एकुण १९१ लाभार्थींना दिव्यांगाचे टक्केवारी नुसार त्यांचे थेट बँक खात्यात आरटीजीस  नेफ्ट द्वारे वितरीत केला जाणार आहे.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. कुलभुषण रामटेके हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ता जावेद शेख, अन्नु साधवानी, सागर वाढई, विलास बन्सोड, केंद्रप्रमुख अंबाजी आमनार ई. मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमांची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेसमोर दिपप्रज्वलीत करुन व प्रतिमेला माल्यार्पन करुन करण्यात आली. नगर परिषदेच्या वतीने आ. रामदासजी मसराम यांचे शाल – श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचीन्ह देऊन सत्कार करण्यात आले. प्रास्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे  यांनी केले. या प्रसंगी बोलतांना आ. रामदास मसराम म्हणाले की, दिव्यांग बांधवांकरीता शासन अनेक योजना राबवित असते, परंतू सदर योजना दिव्यांग बांधवापर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे याकरीता प्रत्येक तालुका स्तरावर ज्याला दिव्यांगांकरीता असलेल्या सर्व योजनांची माहिती असेल असे दिव्यांग अधिकारी नेमण्याकरीता शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.

तसेच या प्रसंगी कार्यक्रमांचे अध्यक्ष प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. कुलभुषण रामटेके  म्हणाले की, यानंतर सुध्दा लाभ देण्याकरीता दिव्यांग बांधवांचे अर्ज स्विकृती करण्यात येतील. तरी पात्र दिव्यांग बांधवांनी या आवश्यक त्या कागदपत्रासह नगर परिषदेकडे अर्ज सादर करावा. तसेच नगर परिषदेचे वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यांनी केले.

या कार्यक्रमांकरीता नगर परिषद क्षेत्रातील दिव्यांग बांधव व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता कार्यालय अधिक्षक प्रमोद येरणे, लेखापाल अविनाश राठोड, लेखापरिक्षक श्रीकांत वरकडे, अभियंता सौरभ नंदनवार, अशिष गेडाम, कर विभाग प्रमुख स्वप्नील हमाने, कर व प्रशासकिय सेवा प्रफुल हटवार, विलास बोंदरे, प्रफुल दुपारे, सुंदरलाल पटले, अरुण मोटघरे, व्यंकट चौधरी, शुभम पेंदाम, घनश्याम कांबळे, सत्यवान कोडाप, अमर शेंडे, अनुराग सारोटे, लक्की बिरहा, रामचंद्र सिडाम, नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी व नगर परिषद क्षेत्रातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी सहकार्य केले.

Latest Posts

Don't Miss