Latest Posts

नवे सिम घेण्यासाठी कागदपत्रांचे झेरॉक्स नाही, डिजिटल केवायसी अनिर्वाय : नव्या वर्षापासून मोठा बदल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : दूरसंचार मंत्रालयाने (Ministry of Telecom) १ जानेवारी २०२४ पासून नव्या मोबाईल कनेक्शन (New Mobile Connection) खरेदीचे नियम बदलले आहेत. यामुळे आता ग्राहकांना नवे सिमकार्ड (New SIM Card) घेणे सोपे झाले आहे.

देशात डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी, दूरसंचार विभागाने (Telecom Ministry) माहिती दिली आहे की, आता नवे सिम कार्ड (SIM Card) मिळविण्यासाठी पेपर बेस्ड केवाईसी (Paper Based KYC) वर पूर्ण बंदी असेल. त्यामुळे आता नवे सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहकांना फक्त डिजिटल किंवा ई-केवायसी (e-KYC) सबमिट करावे लागणार आहे.

दूरसंचार विभागाकडून अधिसूचना जारी –
दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने मंगळवारी एक अधिसूचना जारी करून नव्या नियमांबाबत माहिती दिली. नवीन वर्षापासून म्हणजेच, १ जानेवारी २०२४ पासून सिम कार्ड खरेदीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. आता कोणत्याही ग्राहकाला सिमकार्ड मिळविण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक असेल आणि आता कागदावर आधारित केवायसी पूर्णपणे बंद होईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

याशिवाय नवीन मोबाईल कनेक्शन घेण्याचे उर्वरित नियम तसेच राहणार असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही अधिसूचनेतून सांगण्यात आलं आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सिम कार्ड मिळविण्यासाठी, आपण ई-केवायसी सोबत पेपर आधारित केवायसी करू शकता, परंतु आता १ जानेवारीपासून ते पूर्णपणे बंद केले जाईल.

१ डिसेंबर २०२३ पासून सिम कार्डच्या नियमांमध्ये बदल –
याआधी दूरसंचार मंत्रालयाने सिमकार्डशी संबंधित आणखी एक नियम बदलला आहे. नियमांमध्ये बदल करून केंद्र सरकारने १ डिसेंबरपासून एका आयडीवर मर्यादित सिम जारी करण्याचा नियम लागू केला आहे. सिमकार्ड मिळवण्यापूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून आता सिम खरेदी करणाऱ्यांसोबतच सिम विक्रेत्याचीही नोंदणी केली जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने एकाच वेळी अनेक सिमकार्ड खरेदी केली, तर तो केवळ व्यावसायिक कनेक्शनद्वारेच सिम कार्ड खरेदी करू शकणार आहे.

Latest Posts

Don't Miss