Latest Posts

नवरगांव बँक ऑफ इंडिया कडून जीवन ज्योती विम्याचा लाभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही (Sindewahi) : मागील अनेक वर्षांपासून केंद्र शासनाने सर्वच राष्ट्रीयकृत बँकांच्या मार्फतीने प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेची सुरवात केली. या विम्याला सद्यस्थितीत ४३६ रुपये या वार्षिक देय प्रमाणे. भरून या विमाचा लाभ घेता येतो. सिंदेवाही तालुक्यातील नांदगांव येथील मंदा खेमचंद चौके यांनी हा विमा बँक ऑफ इंडिया नवरगाव मधून काढलेला होता. परंतु नुकताच त्याचा १ जून २०२५ रोजी आजारपणातून मृत्यू झाला असल्याने घरच्यांनी बँकेत विचारपूस केली असता.

बँक मित्र शशिकांत लेंझे व मातृभुषण मोटघरे यांच्या पुढाकाराने त्यांचे वारसदार मुलगा जयंता खेमचंद चौके यांना २ लाख रुपयांचा धनादेश १९ जुलै शनिवार ला शाखा प्रबंधक प्रकाश पांडा व बैंकतील अधिकारी आशिष रामटेके यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. ५ वर्षात ३० हून अधिक लाभार्थ्यांना या विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे कार्य नवरगाव शाखेने केलेले आहे.

तसेच किसान दिवस व बँक राष्ट्रीयकृत दिवस साजरा करण्यात आला व नियमित कृषी कर्ज परतफेड करणाऱ्या २५ शेतकऱ्यांना नव्याने कर्ज वितरण तसेच परिसरातील महिला स्वयं. सहा. समूह (बचत गट) जे बँक ऑफ इंडिया नवरगाव शाखेला जोडले आहेत अशा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या २० समूहांना १९ जुलै ला कर्ज वितरीत करण्यात आले. या प्रसंगी प्रबंधक यांनी विविध बँकेच्या योजना, व शेतकऱ्यांना यांत्रिक शेतीसाठी बँकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सोई सुविधा व सिंचनाच्या योजना यावर प्रकाश टाकला.

तर अधिकारी आशीष रामटेके यांनी बचत गटांना विविध गृहउद्योग, व शेतीसोबतच परस्पर पूरक उद्योग व नियमित कर्ज परतफेड याचे फायदे सांगितले. तर बँक मित्र व बँक सखी यांनी विमा योजनेची व RD / FD खाते व पेन्शन योजने विषयी माहिती सांगितली.

Latest Posts

Don't Miss