Latest Posts

नरेंद्र फुलझेले यांच्या मार्गदर्शनात दूध भेसळ समिती बैठक संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (wardha) : दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ अथवा मिलावट आढळून आल्यास विक्रेत्यावर कारवाई करण्याच्या सुचना अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी दूध भेसळ समितीच्या बैठकीत दिल्या.

अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कक्षात अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली दूध भेसळ समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी सुचना दिल्या बैठकीला जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाचे दुध संकलन अधिकारी एस. जी. उईके, गुनहे शाखेचे पोलीस निरिक्षक चौधरी, दूध भेसळ समितीचे सदस्य उपआयुक्त टोपले, खोपडे, अस्टके, बुराडे, कोरडे आदी उपस्थित होते.

दूध भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यासाठी धडक मोहिम राबविण्याच्या सुचनाही यावेळी फुलझेले यांनी दिल्या. यासाठी पोलिस विभागाचे सहकार्य घेऊन कार्यवाही करावी असे सुचित केले. यावेळी एस. जी. उईके यांनी दूध भेसळीच्या अनुषंगाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल बैठकीत सादर केला.

Latest Posts

Don't Miss