Latest Posts

नागभिड तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात वृध्दाचा मृत्यू : मोहफुले वेचताना घडली दुर्दैवी घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandapur) : गावालगतच्या जंगलात मोहफुले वेचायला गेलेला वृध्द वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना आज मंगळवारी १५ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे. मारोती सखाराम बोरकर (६०) असे मृतकाचे नाव असून नागभिड तालुक्यातील गंगासागर हेटी येथील रहिवासी आहे.

नागभिड तालुक्यातील तळोधी (बा.) वन परिक्षेत्रातील गंगासागर हेटी येथील मारोती सखाराम बोरकर (६०) वृध्द गावातील काही व्यक्तींसोबत गावालगतच्या जंगलात सकाळी ६ वाजताच्या सुमारास मोहफुले वेचायला गेले. दररोज ते ८.३०-९ वाजेपर्यंत मोहफुले वेचून घरी परत यायचा. परंतु आज ते घरी परत आले नाही. त्यामुळे घरचे व शेजाऱ्यांनी गावालगतच्या जंगलात शोधाशोध केली असता, लगतच्या पांदनरस्त्यावर त्यांची चप्पल व टोपली पडलेली आढळून आली. मोहफुले वेचून त्यांचे सोबती जंगलाबाहेर निघाले परंतु मारोती सखाराम बोरकर हे जंगलातून निघाले नाही. त्यामुळे शंका निर्माण झाली. काही वेळातच त्याच परिसरात सहकाऱ्यांना वाघ आढळून आला. त्यामुळे सदर व्यक्तीचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाल्याचा संशय निर्माण झाला. काही अंतरावर जावून पाहिले असता त्यांचा मृतदेह आढळून आला.

सदर घटनेची माहिती तळोधी (बा.) वन परिक्षेत्राधिकारी व पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच वनविभागाचे अधिकारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरीता नागभीड येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले.

Latest Posts

Don't Miss