विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी वप्रतिभावंत खेळाडू तयार करण्यासाठी शासन सतत प्रयत्नशील आहे. राज्यातील खेळाडूनी ऑलिंम्पिक सारख्याआंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके संपादित करण्याकरीता नियोजनबद्ध प्रयत्न होणे गरजेचे आहे. राज्यातील खेळाडूसाठीअद्यावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभुत सुविधा, क्रीडा वेद्यकशास्त्र क्रीडा स्पर्धाचे आयोजन, खेळाडूंनापुरस्कार व प्रोत्साहन खेळाडूंकरीता करीअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी / विदेशी प्रशिक्षक वसंस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मिशन लक्षवेध या महत्वाकांक्षीयोजनेची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मिशन लक्षवेध अंतर्गत निवडण्यात आलेल्या ॲथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉन टेनिस, रोईंग, शुटींग, सेलींग टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती या १२ क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खाजगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन अश्या संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.
मिशन लक्षवेध अंतर्गत खाजगी अकादमींना आर्थक सहाय्य करावयाच्या दृष्टीने संबंधित अकादमी मधीलखेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभुत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य वक्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकर करण्यात येऊन, ३५ ते ५० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था क वर्ग, ५१ ते ७५ गुण प्राप्तकरणाऱ्या संस्था ब वर्ग व ७५ ते १०० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था अ वर्ग अश्या प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार हे. कवर्ग अकादमींना वार्षिक रु.१०.०० लक्ष, ब वर्ग अकादमींना वार्षिक रु. २०.०० लक्ष व अ वर्ग अकादमींनावार्षिक रु. ३०.०० लक्ष आर्थिक सहाय्य, पायाभुत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे इ. बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे.
त्यानुसार इच्छुक संस्थांनी अधिक माहिती व अर्जाचे नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा व परिपुर्ण प्रस्ताव ५ एप्रिल २०२५ पर्यंत सादर करावे व सदर योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा असे आवाहन भास्कर घटाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांनी केलेले आहे.
