Latest Posts

सुक्ष्म सिंचन, एकात्मिक फलोत्पादनासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा

अनुसुचित जाती – जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यां साठी विशेष मोहीम :  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रिती म. हिरळकर यांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : जिल्ह्यात राष्ट्रीय कृषि विकास योजनेतुन प्रतिथेंब अधिक पीक, या सुक्ष्म सिंचन योजना आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत यंदा अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर वाढविण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सन २०२५ – २०२६ पासुन प्रथम अर्जास, प्रथम लाभ या तत्वावर लाभार्थीची निवड करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  प्रिती म. हिरळकर यांनी केले आहे.

संबधित शेतकऱ्यांनी विविध कृषि योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची आवश्यकता आहे. तसेच योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याकरिता संबधित शेतकऱ्यां चा फार्मर आयडी असणे आवश्क आहे. शेतकऱ्यांना www.mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ठिंबक व तुषार घटकांची निवड करुन अर्ज सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

कृषी विभागाकडुन एकात्मिक विकास अभियान योजने अंतर्गत मसाला पिके, जुन्या फळबांगाचे पुनरुज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, पाँली हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, पँक हाऊस, कांदाचाळ, यांत्रिकीकरण, मशरुम उत्पादन, काढणी पश्चात व्यवस्थापन या घटकांखाली जास्तीत जास्त लाभार्थी शेतक-यांनी अर्ज करुन योजनेतील घटकांचा लाभ द्यावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रिती म. हिरळकर यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss