विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : या शैक्षणिक वर्षाकरीता mahadbt.maharashtra.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज जुलै पासून स्विकारणे सुरु झालेले आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी शुल्क निर्धारण समितीकडून शुल्क मंजूरीची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन करण्यातआले आहे.
जिल्ह्यातील संबंधित सर्व महाविद्यालयातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी महाडीबीटी पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे पालन करुन ऑनलाईन प्रणालीत अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या ०७१५२-२५०७७३ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ यांनी कळविले आहे.
