विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक सामान्य, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडून अर्ज सादर करावा.
संबंधित माहिती व मदतीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, किंवा कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.
संपूर्ण प्रक्रिया प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ऑनलाईन राबविली जाणार आहे. अर्जांना पूर्वसंमती, मोका तपासणी आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर SNAP पोर्टलद्वारे अनुदान वितरण अशी संपूर्ण प्रक्रिया पार पडेल.
विशेषतः वनपट्टाधारक अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९०% अनुदानाच्या दराने लाभ दिला जाणार आहे.
शेतकरी बांधवांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संगिता माने यांनी केले आहे.
