Latest Posts

प्रेमप्रकरनाच्या नैराश्यातून युवतीने गळफास घेऊन केली आत्महत्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (balharpur) : प्रेमप्रकरण चा नैराश्यातून युवतीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी ३ वाजता उघडकीस आली. दुर्गा प्रकाश चिंचुलकर (१९) रा. विसापुर असे युवतीचे नाव आहे.

बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विसापुर येथील वॉर्ड क्रं. ४ मधील युवती दुर्गा प्रकाश चिंचुलकर ही आज चंद्रपूर ला गेली होती. तिथून आल्यावर आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास तिने आपल्या राहत्या घरी ओढणीने सीलिंग फॅन ला गळफास घेऊन आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार दुर्गा प्रकाश चिंचुलकर हीचे एका स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या युवका सोबत मागील चार पाच महिन्यांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. या विषयी तिच्या घरच्या लोकांनी तिला समजविले होते. अश्यातच आज ती चंद्रपूर वरून आल्यावर घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे, हवालदार कुमरे करीत आहे.

Latest Posts

Don't Miss