विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून, मुल पोलिसांनी रितेश राजू बाग (२५), रा. खरबी, ता. कुही, जि. नागपूर या आरोपीस अटक करून न्यायालयीन कोठडीत रवाना केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ साली आरोपी आपल्या मामाच्या गावी राहण्यासाठी गेला असताना त्याची शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मोबाईलवर संभाषणात झाले. आरोपीने पीडितेला सोमनाथ येथे दर्शनासाठी बोलावले. दर्शनानंतर आरोपीने तिला डोंगराळ भागात नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
तसेच आरोपीने पीडिता सोबत आणखी दोन वेळा अत्याचार केले आहे. पीडित मुलगी २४ जुलै २०२५ रोजी मुल पोलिस ठाण्यात पोहोचली. तिचे वन स्टॉप सेंटर येथे समुपदेशन करण्यात आले आणि बाल कल्याण समितीसमोर जबाब नोंदवण्यात आला. तिच्या जबाबानंतर आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा २०१२ व भारतीय दंड विधानातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास मुल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम करीत आहेत.
