– मोहिमेचा लाभ घ्यावा : तहसीलदार निलेश कदम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : महसूल प्रशासनाच्या पुढाकाराने साकोली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी जिवंत सातबारा मोहीम राबविली जात आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून ही विशेष मोहीम १ एप्रिल २०२५ ते १० मे २०२५ या कालावधीत राबविली जाणार आहे.
मयत खातेदारांचे वारस अद्ययावत करण्याची संधी
तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर मयत खातेदारांची नावे आहेत त्यांचे वारस दाखल करण्यासाठी महसूल विभागाने ठरावीक कालमर्यादा निश्चित केली आहे.
असा असेल मोहिमेचा टप्पा :
१ ते ५ एप्रिल २०२५: तलाठी गाव निहाय मयत खातेदारांची यादी तयार करून चावडी वाचन करतील.
६ ते २० एप्रिल २०२५: आवश्यक कागदपत्रांसह वारसदारांनी अर्ज सादर करावा. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) चौकशी करून वारस ठराव मंजूर करतील.
२१ एप्रिल ते १० मे २०२५: ई-फेरफार प्रणालीत नावनोंदणी करून सातबारा उतारे अद्ययावत केले जातील.
शेतकऱ्यांनी मोहिमेचा लाभ घ्यावा – तहसीलदारांचे आवाहन
सर्व पात्र शेतकरी बंधूंनी आपली कागदपत्रे वेळेत सादर करून या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार निलेश कदम यांनी केले आहे. ही संधी गमावू नका आणि आपल्या जमिनीचे मालकी हक्क सुरक्षित करा!
