Latest Posts

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा अर्ज गावातील ग्राम बाल संरक्षण समिती येथे करावे सादर

– जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय ३० मे २०२३ नुसार ० ते १८ वयोगटातील अनाथ, निराश्रीत, एकपालक, आजाराने ग्रस्त एचआयव्ही, सिकलसेल, बाधीत बालके जन्मठेपेचीशिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके इत्यादी JJ Act नुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांकरिता महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली अंतर्गत जिल्हयातील बालसंगोपनयोजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता जिल्हयातून लाभार्थी बालके हे जिल्हास्तरीयकार्यालयात येत असतात त्यामुळे आपल्या जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र तसेच वाहतुकीचे साधने, जिल्हयाचे क्षेत्रफळ याचा विचार करता लाभार्थ्यांना जिल्हा स्तरीय कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात अनेक अडचणीनिर्माण होताना निर्दशनास आले होते. सदर लाभार्थ्याची गैरसोय होवू नये याकरिता बालसंगोपन योजनेचाअर्ज जिल्हास्तरावर न घेता गावातच ग्राम बाल संरक्षण समिती मार्फत घेण्यात येणार आहे. तरी जिल्हयातीलपात्र लाभार्थ्यांनी बालसंगोपन योजनेचा लाभ घ्यायचे असल्यासमी १ एप्रिल २०२५ पासून जिल्हास्तरीयकार्यालयात प्रस्ताव सादर न करता गावातच ग्राम बाल संरक्षण समिती मार्फत अर्ज सादर करण्यात यावे. ग्रामबाल संरक्षण समितीच्या शिफारशी शिवाय प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाही.

अधिक माहिती करिता आपल्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारीकार्यालय किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली या कार्यालयास दुरध्वनी क्रमांक ०७१३२-२२२६४५ यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्रकाश भांदककर यांनी केले आहे.

बाल संगोपन योजने करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहे –

विहीत न मुन्यातील अर्ज, पालक व बालकासह घरासमोरील पोस्ट कार्ड आकाराचा १ फोटो, चालु वर्षाचाउत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार), पालकाचे आधार कार्ड, बालकाचे आधार कार्ड, बालकाचेराष्ट्रीयकृत बँकेतील / पोस्ट बँक खाते, आधार सिंडींग पावती, बालकाचा जन्माचा दाखला, बालकाचा चालुवर्षाचा बोनाफाईड प्रमाणपत्र, पालकाचा मृत्युचा दाखला, लाभार्थी रहिवासी दाखला(तलाठी/ग्रामसेवक/नगरसेवक/सरपंच यांच्याकडून निर्गमित केलेले), पालक कारागृहात असल्याबाबतचेप्रमाणपत्र (लागु असेल तर), पालक HIV ग्रस्त असल्यास प्रमाणपत्र (लागु असेल तर), सिकलसेल असल्यासप्रमाणपत्र (लागु असेल तर). विशेष सुचना- वरिल सर्व कागदपत्रे याची १ मुळ प्रत व १ छायांकित झेरॉक्स प्रत अशा एकुण २ प्रती तयारकराव्या व २ फाईल मध्ये लावून आपल्या गावातीलच ग्राम बाल संरक्षण समिती येथे अर्ज सादर करण्यात यावे.असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss