Latest Posts

कर्मवीर विद्यालयात पर्यावरण प्रबोधन व पक्षी जल पात्र वितरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कर्मवीर विद्यालय येणबोडी येथे पर्यावरण प्रबोधनाचा आणि जलपात्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका पडोळे, प्रमुख पाहुणे मोहम्मद शरीफ अध्यक्ष पर्यावरण वाहिनी, विनायकराव साळवे, मनोहर माडेकर, ज्येष्ठ शिक्षक लोहे, ज्यु. कॉलेजचे देवाळकर, हरित सेना प्रमुख एन. पी. वांढरे आणि आयोजक आर. डी. वाळके उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी पर्यवारणाचा होणारा ऱ्हास आणि पशु पक्षांच्या अस्तीत्वाबद्दल चिंता व्यक्त केली. उन्हाळ्यात पक्षांना पाणी उपलब्ध होत नाहीं, त्यांचे नाहक जीव जातात त्यामुळे जर आपण घरोघरी पक्षांकारिता जलपात्रांची सोय जर केली तर ती त्यांच्याकरिता जीवनदायीनी होऊ शकते आणि पक्षांना पाणी दिल्याचे समाधान तुम्हला लाभेल.

सदर कार्यक्रम प्रसंगी प्रत्येक वर्गास एक जलपात्र वितरित करण्यात आले. आणि त्याचा उपयोग पक्षांच्या पाण्याकरिता कसा करावा याचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमांस शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि असंख्य वद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन लोहे सरांनी केले.

Latest Posts

Don't Miss