विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Balharpur) : बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुनी दहेली येथील एका इसमाने काल १८ जुलै रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रवीण उर्फ निखिल किसन काटोले (३२) असे गळफास घेणाऱ्या इसमाचे नाव आहे.
जुनी दहेली येथील मृतक प्रवीण उर्फ निखिल किसन काटोले याला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी मागील चार पाच महिन्यांपासून माहेरी निघून गेली होती. काल सोडचिठ्ठी घेण्याकरिता बैठक झाली होती. व दोन तीन दिवसात सोडचिठ्ठी होणार होती. त्याच कारणाने मृतक प्रवीण उर्फ निखिल किसन काटोले याने मनावर घेऊन घरी सीलिंग फॅन ला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात होते.
पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून शव विच्छेदन करीता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविले. प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष येनगंधेवार, हवालदार दिपक खरतड करीत आहेत.
