Latest Posts

इंटरनेट वापरात महाराष्ट्र अग्रेसर : १४ ते १८ वर्षे वयोगटात सर्वाधिक वापरकर्ते

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : इंटरनेट वापरात महाराष्ट्र अग्रेसर ठरला आहे. पॉक्सो ॲण्ड बियॉण्ड अंडरस्टॅण्डिंग ऑनलाइन सेफ्टी डय़ुरिंग कोविड, २०२३ हे संशोधन नुकतेच क्राय या स्वयंसेवी संस्थेमार्फत करण्यात आले.

या संशोधनानुसार महाराष्ट्रात सर्व वयोगटांमधील इंटरनेट वापराचे सरासरी प्रमाण सर्वाधिक आहे. त्याखालोखाल पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि मग कर्नाटकचा क्रमांक लागतो. पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये (14-18 वर्षे वयोगट) इंटरनेट वापराचे प्रमाण सर्वाधिक आहे, त्यानंतर प्रौढ स्त्राr-पुरुष (18 वर्षांवरील) आणि त्यानंतर लहान मुले-मुली (6-14 वर्षे वयोगट) असा क्रम आहे. महाराष्ट्रात मात्र लहान मुले-मुलींमध्ये (6-14 वर्षे वयोगट) सरासरी इंटरनेट वापराचे प्रमाण अधिक आहे.

क्राय वेस्टच्या प्रादेशिक संचालक क्रिॲन रबाडी यांनी सांगितले की, तंत्रज्ञान हा लहान मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होत आहे. लहान मुले ऑनलाईन असताना त्यांना हानीकारक किंवा अयोग्य पंटेंटपासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे. क्राय गेल्या अनेक वर्षांपासून बाल संरक्षणाच्या क्षेत्रात काम करत असून आम्ही सायबर सुरक्षेवर भर दिला आहे. सध्या पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना आभासी/सायबर विश्वात माहितीच्या सुरक्षित व जबाबदार वापरास उत्तेजन देण्याचे तसेच त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम आम्ही करत आहोत.

सायबर क्राईमपासून कसे वाचाल?
फोनचे पासवर्ड्स सुरक्षित कसे ठेवावेत, स्मार्ट फोन्सचे संरक्षण कसे करावे, सोशल मीडिया खात्यांवर खासगी माहिती शेअर करताना कोणती काळजी घ्यावी, आपल्या खात्यांची प्रायव्हसी सेटिंग्ज कशी वापरावीत, सायबर छळाला बळी पडल्यास कोठे तक्रार करावी याविषयी शालेय विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी क्राय या बालहक्क स्वयंसेवी संस्थेने कार्यशाळेचे आयोजन केले. आतापर्यंत वीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत भाग घेतला आहे. जानेवारी 2024 मध्ये अभियानाची सांगता होणार आहे. सायबर छळाला सामोरे गेल्याचे तसेच अज्ञात व्यक्तींकडून ऑनलाईन, विशेषतः स्नॅपचॅट ॲपवर, फ्रेंडशिप रिक्वेस्ट्स येत असल्याचे या कार्यशाळेत उपस्थित मुला-मुलींनी सांगितले. स्नॅपचॅट ॲप हे इन्स्टाग्राम किंवा फेसबुकहून अधिक लोकप्रिय असल्याचेही कार्यशाळेतून दिसून आले.

Latest Posts

Don't Miss