विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार १ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाण आहे.
१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नागपूर येथून वर्धा कडे प्रयाण करतील. सकाळी १० वाजता भाजप कार्यालय येथे आगमन पदाधिका-यांसमवेत बैठकीस उपस्थिती. दुपारी १ वाजता देवळी येथील नाट्यगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ३ वाजता वर्धा येथील जेष्ठ नागरिक भवन उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ५ वाजता वर्धा येथून नागपूर कडे प्रयाण करतील.
