Latest Posts

गुढीपाडवा निमित्त आर एसएस चे पथ संचालन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपुर (Ballarpur) : गुढीपाडवा निमित्त आर एसएस चे पथ संचालन हिंदू नव वर्ष गुढीपाडव्याच्या निमित्त शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ३० मार्च रोजी पथसंचालन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा उत्सव पैकी एक उत्सव गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा केला जातो. त्यात पथ संचालन, तालुका व शहराची कार्यकारिणी घोषित केल्या जातात. तसेच वर्षभराचे कार्यक्रम आखल्या जातात.

याच निमित्त बल्लारपूर शहरातील स्केटिंग ग्राउंड येथे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात प्रमुख तुषार देवपुजारी जिल्हा संघचालक, विवेक गडकर बल्लारपूर तालुका संघचालक व अनंत देहणकर विभाग शारीरिक प्रमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या अगोदर टेकडी विभागात आर एस एस कार्यकर्ते द्वारे पथसंचालन करण्यात आले.

Latest Posts

Don't Miss