विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /वर्धा (Wardha) : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश सत्र २०२५ साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet. gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी, सेलू, आष्टी, कारंजा, समुद्रपूर या तालुक्यातील संस्थांमध्ये ईलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर, वायरमन, ड्रेस मेकिंग, मोटर मेकेनिक, टर्नर, प्लंबर, डाटा एंट्री ऑपरेटर इत्यादी रोजगारामुख अभ्यासक्रम उपलब्ध आहे. प्रवेश घेऊ इच्छिणारा विद्यार्थी किमान ८ वी अथवा १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
आरक्षित प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार आरक्षण राहील. मुलींसाठी सुरक्षित प्रवेश व महिला अनुकूल व्यवसाय राहणार आहे. अर्ज सादर करतांना शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रिका, आधारकार्ड, जात व रहिवासी प्रमाणपत्र व पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सादर करावे लागेलप्रशिक्षणानंतर शासकीय अप्रेंटिसशिप, विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी संधी, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन, डीव्हीईटी व एनसीव्हीटी मान्यता प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी स्थानिक आयटीआय संस्थेशी संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी कळविले आहे.
