Latest Posts

विदर्भातील युवकांसाठी सुवर्णसंधी : अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती मेळाव्यासाठी विदर्भातील दहा जिल्ह्यांतील (बुलढाणा जिल्हा वगळून) इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही नोंदणी प्रक्रिया २५ एप्रिल २०२५ पर्यंत www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्ज ऑनलाईन असून उमेदवारांना www.joinindianarmy.nic.in या पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. भरतीसाठीची लिखित परीक्षा (CEE) येत्या मे व जून २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे.

या भरतीबाबत माहिती देताना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आनंद पाथरकर यांनी सांगितले की, विदर्भातील युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

देशसेवेच्या संधीसाठी ऑनलाईन अर्ज वेळेत भरावा.विदर्भातील युवकांमध्ये देशसेवेबाबत उत्साह असून, अशा भरती प्रक्रियेमुळे त्यांना सैन्यदलात सामील होण्याची संधी प्राप्त होत आहे. बुलढाणा जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss