– तरुणाईबरोबरच ज्येष्ठांनासुधा घिबलीने घातली भुरळ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही(Sindewahi) : सोशल मीडियावर सतत नवनवे ट्रेंड येत असतात. मग त्याचे अनुकरण सर्वसामान्यांकडून सर्रासपणे केले जाते. सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेला नवा ट्रेंड म्हणजे घिबली. कार्टून फोटो म्हणजेच घिबली. एआयच्या माध्यमातून फोटो तयार करून सोशल माध्यमांवर टाकण्याची फॅशनच सध्या आलेली दिसते.
आकर्षक व लोभसवाण्या फोटोंची भुरळ सध्या भल्याभल्यांना पडलेली दिसते. कॉलेज तरुणांबरोबरच नोकरवर्ग व मोठमाठे व्यावसायिक आणि राजकीय नेतेदेखील आपले कुटुंबासोबतचे, फिरायला गेलेले, मोठ्या व्यक्तीसोबतचे फोटोंचे कार्टून बनवून समाज माध्यमांवर पोस्ट करताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर आणि अनेकांच्या स्टेटस स्टोरीला वेगळेच चित्र पाहायला मिळू लागले आहे. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक
यांसह अन्य सोशल मीडियावर सध्या हा धिबली ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. प्रत्येक जण या ट्रेंडचा वापर करून आपल्याकडील संग्रहित छायाचित्रांची कार्टून बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत आणि त्याला नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशा फोटोंवर असंख्य लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.
यांसह अन्य सोशल मीडियावर सध्या हा घिबली ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. प्रत्येक जण या ट्रेंडचा वापर करून आपल्याकडील संग्रहित छायाचित्रांची कार्टून बनवून सोशल मीडियावर व्हायरल
करत आहेत आणि त्याला नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशा फोटोंवर असंख्य लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.
इतकेच नव्हे, तर अनेक जन कुटुंबांसह सोबत काढलेले छायाचित्रे देखील कार्टून बनवून व्हायरल करताना दिसत आहेत. तरुणाईबरोबरच ज्येष्ठांनासुधा घिबलीने भुरळ घातली आहे. अनेक ज्येष्ठांनीही आपले कार्टून छायाचित्र बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले दिसत आहे.
