Latest Posts

भू – प्रणाम केंद्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आभासी पध्दतीने लोकार्पण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (wardha) : नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने महा ई – सेवा केंद्राच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागातर्फे उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय वर्धा येथे भू प्रणाम केंद्र सुरु करण्यात आले आहे. या भू – प्रणाम केंद्राचे लोकार्पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आभासी पध्दतीने लोकार्पण करण्यात आले. यावेळी सदर कार्यक्रमास वर्धा येथून प्रभारी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सुनिल बन, आर्वी उप अधिक्षक भूमी अभिलेख संजय हुलके, सेलूचे सुखदेव खोंडे  तसेच जिल्‍हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांच्या सोइच्या दृष्टीने स्वागत कक्ष व अभ्यागतासाठी अभ्यागत व विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या ई सेवा केंद्रा प्रमाणे भू प्रणाम केंद्र तयार करण्यात आलेले आहे. या भूप्रणाम केंद्रामध्ये भू अभिलेख विभगाच्या ज्या सेवांसाठी जनतेला इतरत्र सुरु असलेल्या ई सेवा केंद्रांमध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागत होता.

या सर्व सेवा यामध्ये मोजणी अर्ज करणे, नगर भूमापनाकडील फेरफार अर्ज भरणे, भूमि अभिलेख विभगाच्या विविध अभिलेखाच्या नकला, मिळकत पत्रिका नक्कल, स्कॅनिंग अभिलेख नकाशा, अशा ई आज्ञावली मार्फत पुरविण्यात येणाऱ्या सर्व सेवा आता नागरिकांना भूप्रणाम केंद्रात अतिशय रास्त दरात उपलब्ध होणार आहे.

Latest Posts

Don't Miss