Latest Posts

ग्रामीण भागातील खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचा व रुजवण्यासाठी ग्रामीण भागात खेळ होणे आवश्यक : खासदार रामदास तडस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / देवळी : सद्या क्रीकेटचा विश्वचषक सुरु असुन यामध्ये भारतीय संघाने मोठे यश मिळवीले आहे, शहरी भागात क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस आदी महागडय़ा खेळांना जास्त प्रमाणात पसंती असते. हा खेळ सर्वसामान्य खेळाडूलाही परवडणारा असल्याने ग्रामीण भागातील खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचा व रुजवण्यासाठी ग्रामीण भागात खेळ होणे आवश्यक आहे, देवळी येथे देवळी प्रीमीयर लीगचे आयोजन करुन ग्रामीण भागातील क्रीकेट खेळाडूंना एक संधी उपलब्ध करुन दिली आहे, या संधीचे आपण सोनं करावे असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

देवळी येथील एस.एस.एन.जे. महाविद्यालय क्रीडांगण येथे देवळी प्रीमीयर लीगचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, यावेळी मंगेश वानखेडे, स्वप्नील राउत, मनिश, अर्जुन, अजय, रोहीत, अनुप, देवाश निलेश, अक्षय येसनखेडे, अनुराग, विशाल धपके, विशाल मोहोड उपस्थित होते.

यावेळी ५ टीमनी सहभाग नोंदवील असुन प्रथम पुरस्कार ४४४४रु. व चषक व्दितीय पुरस्कार ३३३३३ रु. व चषक तसेच प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ मॅच खेळाडुला शिल्ड तसेच अंतीम सामन्यात  मॅन ऑफ सिरीज ५००० रु. बेस्ट बॉलर, ३००० रु. व बेस्ट बॅटस्मन ३००० रु देण्यात येणार आहे,

यावेळी वायएसआर टीमचे रीजवान तंवर,योगेश नाखले, स्वप्नील ठाकरे, पॉवर हिटर टिमचे प्रतिक धोटे,मनीश गायधने, जॉन ११ टीमचे  लोकेश झाडे, उमेश तुरनकर, इंडीयन सुपर किंग टीमचे रवी नांदने, सागर कडवे, संदीप येसनखेडे उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss