विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (wardha) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ६ महिन्याचे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी यांना उर्वरीत ५ महिन्याचे वाढीव कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांची आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्राची तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी युवा कार्यकार्य प्रशिक्षणार्थ्यांनी तसेच नियोक्ता यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या कागदपत्राची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ज्या आस्थापना या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी घेण्यास इच्छुक आहेत. त्या आस्थापनांची शासन निर्णयानुसार कार्य प्रशिक्षणार्थी सामावून घेण्याची क्षमता, आवश्यक कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करुनच उमेदवारांना आस्थापनेवर रुजु करुन घ्यावे. आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र, इत्यादी कागपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे.
सर्व इच्छुक कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवार आणि आस्थापना व प्रशिक्षणार्थी यांनी आधार पडताळणी करणे तसेच, आस्थापना / नियोक्ते यांनी कागदपत्रे तपासणीसाठी आपल्या जिल्ह्याचे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांच्याशी ३० एप्रिल, २०२५ पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करुन घ्यावी व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ उमेदवार तसेच, आस्थापना / नियोक्ते यांनी घ्यावा.
याबाबत काही अडचण असल्यास आपल्या जिल्हयातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा या कार्यालयात ०७१२-२४२७५६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा या कार्यालयातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अथवा जिल्हा समन्वयक यांना प्रत्यक्ष संपर्क करावा असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वर्धा यांनी केले आहे.
