विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : कृषि विभागामार्फत नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय कृषि विकास योजना सन २०२५ – २०२६ साठी राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन या बाबीखाली तुषार संच, ठिबक संच, रेनगन, सेमी परमनंट इरिगेशन सिस्टीम यांचा समावेश आहे. तालुका स्तरावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थी करिता १५ ते ३० जून या पंधरवड्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
तरी इच्छूक शेतकऱ्यांनी आपले फार्मर आयडी, ७/१२ नमुना, ८ अ, जातीचे दाखला, आधार क्रमांक (मोबाईल क्रमांक ला लिंक केलेले मोबाईल क्रमांक), बँक पासबुकसह तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कार्यालयाशी किंवा कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. https://mahadbtmahait.gov.in/Farmer या लिंक वर जाऊन अर्जदार अर्ज करून शकतात.
