Latest Posts

अग्नीवीर भरती करीता अर्ज प्रक्रिया सुरु

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (wardha) : भारतीय नौसेनामध्ये अग्नीवीर ( एसएसआर आणि एमआर) भरती करीता अविवाहीत पुरुष आणि अविवाहित महिला उमेदरांसाठी व अग्नीवीर (एसएसआर आणि एमआर) बॅच नंबर ०२ / २०२५, ०१ / २०२६ व ०२ /२०२६ तसेच अविवाहीत पुरुष उमेदवारांसाठी एसएसआर मेडीकल बॅच नंबर ०२ / २०२५ व ०२ / २०२६ या तीनही पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी १० एप्रिल २०२५ पर्यंत www.joinindiannavy.gov.in या संकेत स्थळावर अर्ज सादर करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीपती मोरे यांनी केले आहे.

भरती प्रक्रियेसाठी सर्व माजी सैनिक, विधवा, व विरनारी यांचे पाल्य, तसेच सेवारत सैनिकांचे, युध्दातील जख्मी सैनिकांचे भाऊ व पाल्य, खेळाडू तसेच जिल्ह्यातील पात्र युवक व युवती यांना सहभागी होता येणार आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss