विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : भारतीय सैन्यामध्ये अग्नीवीर भरती जनरल ड्युटी, टेक्निकल, क्लार्क आणि ट्रेड्समन पदासाठी आर्मी रिक्रुटमेंट कार्यालय नागपूर यांच्यामार्फत भरतीची रॅली आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम १० एप्रिल २०२५ आहे.
सर्व सैनिक, विधवा व विरनारी यांचे पाल्य तसेच सेवारत सैनिकांचे, युध्दातील जखमी सैनिकांचे भाऊ व पाल्य, खेळाडू तसेच जिल्ह्यातील पात्र नौजवान यांना यामध्ये सहभागी होता येईल. अधिक माहिती www.joinindianarmy.nic.in या संकेस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अग्नीवीर भरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीपती मोरे यांनी केले आहे.
