विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur): चंद्रपुरातील डॉ. शेषराव इंगोले यांच्या सहचारीणी सुमन शेषराव इंगोले यांचे ३० एप्रिल २०२५ ला वृद्धापकाळमुळे वयाच्या ७८ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्यांचे पती डॉ. शेषराव इंगोले, रवी आणि सागर ही दोन मुले, आणि भारती हीरलेकर व लिना सोनटक्के या दोन मुली या संपूर्ण कुटुंबीयांनी त्यांच्या मरणोत्तर देहदानाचा निर्णय घेतल्यानंतर अखिल भारतीय अनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप अडकिने यांना माहिती दिली. त्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर चे शरीररचना विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. कुलेश चांदेकर यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी मरणोत्तर देहदानाची प्रक्रिया पार पाडली.
या प्रक्रियेमध्ये डॉ. बालकिशन पालीवाल, डॉ. मावानी आणि डॉ. किरण देशपांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरला सुपूर्द केल्यानंतर त्या ठिकाणी स्मृतीशेष सुमन इंगोले यांच्या कार्य स्मृतीला शोकसभेद्वारे आदरांजली वाहण्यात आली.
शोक सभेचे संचालन प्रदीप अडकिणे यांनी केले. इंगोले, सोनटक्के आणि हिरलेकर परिवारातील सदस्यांनी यावेळी आपल्या भावना प्रकट केल्या. भंते धम्मघोष मेत्ता यांनी प्रसंगानुरूप गाथा आणि वंदना म्हटली. यावेळी अंशूजा इंगोले, रंजन व अभिलाषा आवळे, प्रिया भालशंकर, रेखा अहिरे सुधीर जांभुळकर पंजाबराव भगत महेंद्र खत्री, रवींद्र व माधवी गड्डमवार इत्यादी मंडळी हजर होती. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूरच्या माध्यमातून करण्यात आलेले हे २८ वे मरणोत्तर देहदान आहे.
