Latest Posts

अनुकंपाधारकांना दस्तऐवज पडताळणीच्या प्रक्रियेकरीता उमेदवारांना सूचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरावयाच्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, गडचिरोली सन २०२४ व ०१ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणाची तपासणी करुन पूर्ण माहिती असलेल्या एकूण २२४ उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता सुची तयार करुन जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या https://zpgadchiroli.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे फलकावर प्रकाशित करण्यात आलेली होती.

अनुकंपाधारकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, अनुकंपा तत्वावर नियुक्ती संबंधाने आवश्यक शैक्षणिक दस्तऐवजाची २९ एप्रिल २०२५ व ३० एप्रिल २०२५ रोजी ठीक सकाळी ११.०० वाजता पासून पडताळणी करण्यात येणार आहे. तरी प्रकरण पूर्ण असलेल्या वर्ग-३ च्या पदासाठी पात्र असलेल्या अनुकंपाधारक प्रतिक्षाधिन सूचीतील अनुक्रमांक ०१ ते ११२ पर्यंतच्या उमेदवारांनी २९ एप्रिल २०२५ व अनुक्रमांक ११३ ते २१७ पर्यंत व वर्ग-४ च्या पदासाठी पात्र ७ उमेदवारांनी ३० एप्रिल २०२५ रोजी मुळ दस्ताऐवजांच्या छायांकित प्रतीच्या संचासह विर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे उपस्थित रहावे.

प्रतिक्षाधिन सूचीतील अनुकंपाधारकांना केवळ दस्तऐवज पडताळणीच्या प्रक्रियेकरीता बोलविण्यात येत असल्याने उमेदवारांना नेमणूकीकरीता हक्क प्रस्तावित करीता येणार नाही. तसेच अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याची प्रक्रिया वेगळयाने पारदर्शकता ठेवून राबविण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला/भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss