Latest Posts

जिल्हा वार्षिक योजनेचा शंभर टक्के निधी खर्च

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२४ – २५ अंतर्गत जिल्ह्याकरिता शासनाकडून एकूण ३१३.०० कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला होता. १०० टक्के निधी जिल्ह्यास शासनाकडून प्राप्त झाला असून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, यांच्या मार्गदर्शनात सर्व यंत्रणांनी शंभर टक्के निधी खर्च केला आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२४-२५ अंतर्गत जिल्ह्याकरिता शासनाकडून एकूण ३१३.०० कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला होता. सदर निधी पैकी प्रथम टप्पा माहे जुन,२०२४ मध्ये एकूण मंजूर तरतुदीच्या 33 टक्के म्हणजेच रु.१०४.२२ कोटी, तद्नंतर सप्टेंबर, २०२४ ला मंजूर तरतुदीच्या ४० टक्के, नोव्हेंबर, २०२४  मध्ये ६० टक्के, जानेवारी, २०२५ मध्ये ८० व १०० टक्के निधी जिल्ह्यास शासनाकडून प्राप्त झाला.

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, यांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारी, २०२५ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली त्यामध्ये शिल्लक निधीतून विविध योजनाअंतर्गत कामाचे नियोजनास मान्यता प्रदान करण्यात आली.

पालकमंत्री डॉ भोयर यांच्या सुयोग्य नियोजन व मार्गदर्शनामुळे तसेच सातत्याने आढावा घेवून १०० टक्के निधी खर्च होण्याच्या दृष्टीने निर्देश दिले तसेच जिल्हाधिकारी वान्मथी सी., यांनी खर्चाचे सुक्ष्म नियोजन केल्यामुळे सर्व यंत्रणांनी विहित वेळेत प्रस्ताव सादर केले. तसेच ज्या यंत्रणांचा निधी खर्च होवू शकत नव्हता त्या यंत्रणांनी सुध्दा विहित वेळेत अहवाल सादर केल्यामुळे सदर निधीचे योग्य नियोजन केले. त्यामुळेच विहित कालावधीत १०० टक्के निधी खर्च झाला.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२४-२५ अंतर्गत विकास क्षेत्रानिहाय उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीचे विवरण खालिलप्रमाणे आहे. (रुपये लाखात)

विकास क्षेत्र -उपलब्ध करुन देण्यात आलेला –

कृषि व संलग्न सेवा २ हजार ८०९. ८०, ग्रामविकास ४ हजार ९०५.७२, सामाजिक व सामुहिक सेवा १० हजार ५५१. ८२, पाटबंधारे व पुरनियंत्रण २ हजार ३२. ७९, ऊर्जा १ हजार ३६३. ३५, उद्योग व वस्त्रोद्योग २६.३०, परिवहन ३ हजार ८२३.०७, सामान्य सेवा ३ हजार २५९. ७६, सामान्य आर्थिक सेवा १ हजार ७५९.८९, इतर कार्यक्रम ७६७.५० असा एकूण ३ लाख १३ हजार ०००.०० निधी उपलब्ध करून देण्यात आला.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२४ – २५ अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत जिल्ह्याकरिता शासनाकडून एकूण ४४.०० कोटी निधी प्राप्त झाला असून १०० टक्के खर्च करण्यात आला. तसेच आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत १७.४६ कोटी निधी प्राप्त झाला असून १०० टक्के खर्च करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत माहे डिसेंबर २४ अखेर रु. १०टक्के होता. मा.पालकमंत्री महोदय यांचे मार्गदर्शन व सर्व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळे ३१ मार्च पूर्वी १०० टक्के निधी खर्च करण्यात आला. – जिल्हाधिकार वान्मथी सी.,

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे मार्गदर्शन व जिल्हाधिकारी वान्मथी सी., यांच्या योग्य नियोजनामुळे जिल्हा वार्षिक योजनेचा निधी शंभर टक्के खर्च झाला आहे. सर्व कार्यान्वित यंत्रणांनी सुध्दा वेळेत निधी खर्च होईल यासाठी नियोजन केले. – अनिरुद्ध राजूरकवारजिल्हा नियोजन अधिकारी, वर्धा

Latest Posts

Don't Miss