– वायफड सर्कल मधील वायफड, कुरझडी फोर्ट, बोदड, ७७ लक्ष ४५ हजार रुपये विकासकांमाचे भूमिपूजन.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीने देश जागतिक पातळीवर पोहचला असून मागील नऊ वर्षात सबका साथ सबका विकास यातून सर्वानाच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले असल्यामुळे देशाची आणि राज्याची वाटचाल ही विकासामुख होत आहे, सबका साथ सबका विकास या धोरणामुळे ग्रामीण भागाचा सर्वसमावेशक विकास होत आहे. विकास ही न थांबणारी व निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, अनेक आपत्तीचा सामना करत केन्द्र व राज्यसरकार शासन स्तरावर विविध विकासांची काम करीत असते, नागरिकांचे जीवन सुखकर होण्याच्या दृष्टीने विकास कामाच्या माध्यमातून अनेक आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. गावात होणारी विकास कामे ही आपल्यासाठी आहेत. ती चांगली करून घ्या या कामांचे नागरिकांनी संवर्धन करावे, असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.
ते वायफड सर्कल मधील विविध विकास कामांच्या भुमीपूजन व लोकार्पन प्रंसगी बोलत होते.
वायफड सर्कल मधील ७७ लक्ष ४५ हजार रुपये विकासकांमाचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळा वर्धा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रीय खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, देवळी विधानसभा निवडणूक प्रमुख राजेश बकाने, महामंत्री राहुल चोपडा, वर्धा तालुका अध्यक्ष नंदकिशोर, जगदिश टावरी, गजानन दूतारे उपस्थित होते.
विकास कामामध्ये वायफड येथील जिल्हा वार्षिक योजना तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत २७ लक्ष रुपयांचे हनुमान मंदिर देवस्थान परीसरात बांधकाम करणे, कुरझडी फोर्ट येथे २५/१५ अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे १० लक्ष, बोदड येथील २५ /१५ निधी अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे ५ लक्ष, केळापूर येथील जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत स्मशानभूमी सिमेंट रस्ता बांधकाम करणे ७ लक्ष,दहेगांव (स्टे.) येथील महिला बचत गट भवन (उद्योमिता भवन) २७ लक्ष ४५ हजार रूपये, तसेच दहेगावं (स्टे.)येथील जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे ५ लक्ष रुपये विकास कामांचा समावेश आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष.सुनील गफाट, देवळी विधानसभा निवडणूक प्रमुख राजेश बकाने यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले.
यावेळी प्रामुख्याने गौरव गावंडे, विनोद गायकवाड, दत्तामहाजन, किशोर नाल्हे, दिलीप रेवतकर, फुलचंद बोरकर, अरुन डुकरे, रमेश धोबे सरपंच कुरझडी (फोर्ट), अतुल नाईक सरपंच बोदड, सौ.राजश्री गावंडे सरपंच दहेगावं (स्टे.), सौ.सुनीता मसराम सरपंच केळापूर, सौ.कांचर्न बैस उपसरपंच केळापूर, देवेंद्र दुबे, राजू कोडापे, अमित रेवतकर माजी सरपंच कुरझडी (फोर्ट), प्रशांत फुलकरी, अरुण बावणे पुंडलीक अंबुलकर, वसंत झाडे, तसेच मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, गावकरी उपस्थित होते.
