Latest Posts

विकसित महाराष्ट्र २०४७ सर्वेक्षणात १७ जुलैपर्यंत सहभाग नोंदवा : जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू यांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (bhandara) : विकसित भारत या केंद्र शासनाच्या उपक्रमाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारकडून विकसित महाराष्ट्र २०४७ या दीर्घकालीन व्हिजन डॉक्युमेंटची आखणी सुरू आहे. या प्रक्रियेमध्ये नागरिकांच्या आकांक्षा आणि अपेक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी राज्य शासनातर्फे एक संपूर्ण राज्यस्तरीय नागरिक सर्वेक्षण राबवले जात आहे.

या सर्वेक्षणात नागरिकांना फक्त ७ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. यात उत्तर ऑप्शन निवडून, लिखित स्वरूपात किंवा आवाज रेकॉर्ड करून देता येणार आहे. हे सर्वेक्षण नागरिकांपर्यंत सहज पोहोचावे म्हणून लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे : https://wa.link/o93s9m

जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू यांनी आवाहन केले आहे की, भंडारा जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी १७ जुलै २०२५ पर्यंत आपला मौल्यवान अभिप्राय या सर्वेक्षणात नोंदवावा.

शासनाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, तसेच आपल्या संपर्कातील सर्वसामान्य नागरिक, अधिकारी, कर्मचारी, राजकीय पदाधिकारी, बचत गट, स्वयंसेवी संस्था, शिक्षक, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी, नातेवाईक आणि मित्रमंडळींना सर्वेक्षण लिंक पुढे पाठवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss