– विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ मौजा मुरमाडी पं.स. गडचिरोली येथे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर २०२३ ला भगवान बिरसा मुंडा यांच्या गौरव दिनाचे औचित्य साधून विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभाची सुरुवात केली.
या निमित्याने काल ३० नोव्हेंबर २०२३ ला मौजा मुरमाडी पं.स. गडचिरोलीच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आला.
या विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्याने खासदार अशोक नेते यांनी बोलतांना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधुन या यात्रेचा शुभारंभ केला. नववर्षाच्या कार्यकाळात केंद्र सरकारने घेतलेलेे ऐतिहासिक निर्णय व अनेक लोकाउपयोगी, लोकहिताचे, लोककल्याणासाठी केलेल्या कार्यान्वित केंद्र शासनाच्या विविध योजना थेट जनतेपर्यंत पोहचवुन ज्यांना आतापर्यंत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला नाही. अशांना या माध्यमातून सदर केंद्र शासनाच्या योजनांची थेट माहिती व लाभार्थ्यापर्यंत व जनतेपर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रकारचे माध्यम आहे. यात ३ हजार ५०० हून अधिक वनधन विकास केंद्र २०२६ पर्यत ७४० एकलव्य विद्यालय सुरू करण्याचे ध्येय, आदिवासी समुदायाचे सक्षमीकरणात १.१ लाख कोटी ची तरतूद, वन अधिकार अधिनियम, पीएम किसान सन्माननिधी अंतर्गत १ कोटी आदिवासी परिवारांना लाभ यात अनेक योजनांचा समावेश असून विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे प्रतिपादन या यात्रेच्या शुभारंभा प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.
याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप खासदार अशोक नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार गणवीर तर मार्गदर्शन प्रशांत वाघरे यांनी केले.
याप्रसंगी मंचावर प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, तहसीलदार गणवीर, सरपंच भोगेशवर कोडाप, पशुधन विकास अधिकारी डॉ. लेखामी, वैद्यकीय अधिकार डॉ. नरोटे, शाळा. व्यव.स. अध्यक्ष सचिन भुसारी, सामाजिक नेते मनोहर भोयर, यशवंत डोईजड तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक बंधू भगिनीं, आशा वर्कर, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थिती होते.
