Latest Posts

दलित वस्तीतील बालके व महिला अंगणवाडीविना कुपोषणाच्या मार्गावर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तुमसर येथील दुर्गा नगरातील दलित वस्तीत अंगणवाडी केंद्रच नाही. यामुळे एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ येथील बालके व महिलांना मिळत नाही. परिणामतः त्या कुपोषित होण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत.

मिड डे मिल, वैयक्तिक आहार, बालके व गर्भवती महिला कुपोषण अभियान, लसीकरण आरोग्य आहार पोषण अभियान, बालकांची पोषण आणि आहार सुधारणा, पूर्व प्राथमिक शिक्षण, आरोग्य तपासणी संदर्भ सेवा, आरोग्य आहार शिक्षण, लेक लाडकी अशा कितीतरी अनेक योजना एकात्मिक महिला व बालविकास विभागातर्फे अंगणवाडी केंद्रामार्फत राबविल्या जातात.

Latest Posts

Don't Miss