Latest Posts

खंजर बाळगून दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या युवकाला अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील शिवाजी वॉर्ड येथे लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने खंजर बाळगून असलेल्या युवकाला बल्लारपूर पोलीसांनी अटक केले. सदर कारवाई २९ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. विक्की मधुकर बहुरीया (३४) रा. शिवाजी वार्ड, बल्लारपुर असे अटक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

२९ मार्च रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथक चे स्टाफ पोलीस ठाणे हद्दीमध्ये प्रोव्हीशन रेड, जुगार रेड व आर्म ॲक्ट कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत होते. पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरद्वारे माहीती मिळाली की, विक्की मधुकर बहुरिया रा.शिवाजी वार्ड, साई मंदिर जवळ बल्लारपुर हा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने आपले  जवळ खंजर बाळगुन रेल्वे आहे. अश्या माहीती वरून त्याच्या घराची झडती घेतली असता घराचा रूम मध्ये बेड खाली लोखंडी खंजर मिळून आले. खंजर पंचासमक्ष जप्त करण्यात आला व आरोपी विरूध्द भारतीय हत्यार कायदा कलम २५,४ अन्व्ये कायदेशिर कार्यवाही करण्यात आली.

सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, पोलीस हवालदार सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सुनिल कामटकर, पुरूषोत्तम चिकाटे, पोलीस अंमलदार चंद्रशेखर माथनकर, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, लखन चव्हान, म.पो.अं अनिता नायडू यांनी केली.

Latest Posts

Don't Miss