Latest Posts

कोंबड्यांच्या लढतीवर जुगार खेळणाऱ्यावर स्थनिक गुन्हे शाखेची कारवाई : २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेने कोंबड्यांच्या लढतीवर जुगार खेळणाऱ्यावर धाड टाकत ४ इसमाना अटक करीत त्यांच्या कडून २ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोरपना पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना लोणी गावालगत कोंबडे लढतीवर हारजीत जुगार सुरू आहे. पोलिसांनी सापळा रचत धाड टाकले. त्यात अमोल साधुजी खरवडे, (४०), रा. लोणी, ता. कोरपना, जि. चंद्रपूर, संजय शालीक क्षिरसागर, (२९) रा. वनसडी त. कोरपना जि. चंद्रपूर, अनिल किसन बेलेकर, (५४), रा. कोलगाव ता. मारेगाव जि. यवतमाळ, राजेंद्र नानाजी खिरटकर, (४६), रा. गोधनी, ता. मारेगाव, जि. यवतमाळ यांना ताब्यात घेतले तर हे इतर आरोपी पळून गेले. त्यांच्या ताब्यातुन रोख रूपये ३ हजार ६००, ०४ जिवंत झुंजीकरीता लागणारे कोंबडे व ०४ मोटरसायकल असा एकुण २ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा चा माल जप्त करण्यात आले. आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन कोरपना येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कलम १२ (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन कोरपना करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतुत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोहवा किशोर वैरागडे, पोहवा अजय बागेसर, पोहवा जय सिंग, पोना संतोष येलपुलवार, पोशि प्रमोद कोटनाके, पोशि मिलिंद जांभुळे, वाहन चालक पोहवा दिनेश अराडे सह स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केले.

Latest Posts

Don't Miss