Latest Posts

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान संपन्न 

– महिलांना विविध योजनेअंतर्गत ७ हजार ६३५ लाभांचे वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : राज्यामध्ये महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविणेबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत.

त्याअनुषंगाने सदर अभियान नगर परिषद, गडचिरोली कार्यालयामार्फन ०७ डिसेंबर २०२३ रोजी गुरुवारला इंदिरा नगर येथे राविण्यात आलेले असुन सदर कार्यक्रमात अध्यक्ष मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, उद्घाटक माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे व माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर तसेच माजी नगर सेवक प्रमोद पिपरे, बेबी चिचघर, वैष्णवी नैताम, लता लाटकर, केशव निंबोळे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजु मुरमुरवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात विविध योजनांचे १८ स्टॉल लावलेले असून त्यात एकुण १ हजार ५२७ महिला उपस्थित होत्या. सदर महिलांना विविध योजनेअंतर्गत ७ हजार ६३५ लाभांचे वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे संचालन विरेंद्र सोनवान व सूर्यकांत मडावी, सहा. शिक्षक, नगर परिषद, गडचिरोली यांनी केले.

सदर कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली असुन प्रथम पारितोषीक रु. ३ हजार १ व शिल्ड भाग्यश्री पिंपळवार व द्वितीय पारितोषीक रु. २ हजार १ व शिल्ड मिना खोब्रागडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. समूह नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषीक रु. ३ हजार १ शिल्ड इंदिरा गांधी नगर परिषद प्राथ. शाळा व द्वितीय परितोषीक रु. २ हजार १ व शिल्ड अष्टविनायक महिला बचत गट यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच संगित खुची स्पर्धेत प्रथम पारितोषीक रु. २ हजार १ व शिल्ड मंदा ऐडलावार व द्वितीय परितोषीक रु. १ हजार १ व शिल्ड सुषमा वासेकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे.

सदर कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडणेकरीता, नगर परिषद, गडचिरोली कार्यालयाचे सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच नगर परिषद शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे अभार गणेश ठाकरे, NULM विभाग, नगर परिषद, गडचिरोली यांनी केले.

Latest Posts

Don't Miss