Latest Posts

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात भगवंतराव हायस्कूल बोटेकसा जिल्हयात प्रथम

– शाळेला मिळणार 11 लाखाचे बक्षिस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची (korchi) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मा. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ हे अभियान भगवंतराव हायस्कुल बोटेकसा या शाळेने राबवून जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावून ११ लाखाचे बक्षिस मिळविले. मुख्यमंत्री  माझी शाळा सुंदर शाळा अभियानात पायाभूत सुविधा शासन ध्येय धोरण अमलबजावणी तसेच शैक्षणिक गुणवत्ता या मुद्द्यांना अनुसरून जवळपास ३९ निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. विस्तृत स्वच्छता मोहीम, सौंदयीकरण उपक्रम, हरित उपक्रम, सामुदायिक सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता या मुद्द्यांना अभियानात विशेष महत्व देण्यात आले.

जिल्हा परिषद गडचिरोली शिक्षण विभाग यांच्या वतीने वीर बाबुराव शेडमाके सभागृहात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा पुरस्कार सोहळा पार पडला. सोहळ्यात गडचिरोली जिल्ह्याचे मुख्य कार्यपालन अधिकार सुहास गाडे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी भुयार  माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भूसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, डायटचे अधिव्याकराता पुनित भातकर यांच्या हस्ते वनवैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष बबलू भैय्या हकीम, संस्थेच्या सदस्या सौ लिना पठाण (हकीम) संस्थेचे कोषाध्यक्ष अब्दुल जमीर अब्दुल हकीम शाळेचे मुख्याध्यापक समशेरखान पठाण शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांना सन्मानचिन्ह संविधानाची पुस्तक देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी  प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन लाभले. वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलू भैय्या हकीम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की कोरची सारख्या अतिदुर्गम भागातील शाळा जिल्ह्यातून प्रथम येणे ही अभिमानाची बाब आहे. भगवंतराव हायस्कूल बोटेकसा या शाळेच्या यशामुळे जिल्ह्यातील व तालुक्यातील इतर शाळांना प्रेरणा मिळेल या शाळेने पुढील वर्षी पुन्हा विभाग स्तरावर नंबर घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली. या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी वन वैभव शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss