विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूरकरांनी इरई पर्यटनाला या, इरई बचाव जनआंदोलनाच्या सत्य वचनाचे साक्षदार बना असे आवाहन कुशाब कायरकर जनक इरई बचाव जनआंदोलन, संस्थापक वृक्षाई यांनी केले आहे.२२ मार्च २००६ जलसंपदा दिनी उभारलेलले इरई बचाव जनआंदोलन देशात नदी वाचविण्यासाठी नर्मदा बचाव नंतर इरई बचाव हे देशातील दुसरे. इरई बचाव जनआंदोलनचा उद्देश महापुरा पासून व उन्हाळ्यात पाण्या वाचून तडफडणाऱ्या चंद्रपूरकरांना व लागतच्या गावांना सोबतच इरईचं मुख्य पात्र गाळाने बुजले असल्यामुळे मृतप्राय झालेल्या नदीला वाचविणे हा होता व आहे.
जनआंदोलनाने व चंद्रपूरच्या जनतेने सुचविलेल्या दाताळा पूल ते चोराळा पूल हा मुख्य पात्र, त्या पूर्ण बुजलेल्या व जंगल बनलेल्या पट्टयाचे पहिल्यांदा खोलीकरण – रुंदीकरण २० मे २०१५ साली तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर व निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांच्या प्रयत्न व पुढाकाराने इमानदारीने सुरु होऊन ११० फूट रुंदिकारण झाले. ते ३०० फूट करणार त्याच वेळेला तत्कालीन पालकमंत्री यांनी २ रें इरई पुनःरूजीवन घोषित करुन नागपूर रोड ते दाताळा पूल या ५ किलोमीटर पट्टयाचे काम चालू केल्यामुळे पहिल्या बाजूचे काम थंडबस्त्यात गेले. ज्या मूळ पात्रात २५ एप्रिल २०२५ ला पाचव्यांदा पुन्हा कमची सुरवात झाली ते पात्र ११० फूट रुंदीकरणाने व इरईने स्वतः आपल्या प्रवाहाने १६० फूट रुंद केले आहे.
आता फक्त १४० फूट रुंद करने आवश्यक आहे. नदीची रुंदी जुन्या नकाशा प्रमाणे ३०० फूट आहे व ज्या कंपनीला ७० लाख ६७ हजार ३२८ रुपयांचे काम दिले आहे. त्यांनी ३०० फूटावर हिरवे सिमेंट पोल गाडले आहे. प्रशासनाने जनतेला दिलेल्या ३०० फूट रुंदीकरणाच्या दाव्यावर खरे उतरावे. २७ एप्रिल रोजी जनआंदोलनाचे जनक कुशाब कायरकर पात्रात गेले असता तिथं काही प्रशासकीय अधिकारी – लँड डेवलपर, बिल्डर, रेती – माती – गाळ वाहतूकदार, दलाल, ठेकेदारांची मोठी गर्दी दिसली त्या सर्वांचे उद्देश या संधीच सोनं करुन घेण्याचा असू शकतो. भलेही प्रशासन सामाजिक कार्याच्या घोषणा जनकल्याण ची प्रसिद्धी करीत असले तरी घरकुलच्या गरीब जनतेला माफक दरात खरंच रेती, शेतकऱ्यांना शेतीत टाकण्यासाठी मोफत गाळ मिळेल का ? पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी घोषणे प्रमाणे याकडे विशेष लक्ष द्यावे ही जनतेची रास्त मागणी आहे.
वरील सर्व बाबी सत्य असून प्रामाणिक इरई बचाव जनआंदोलनाच्या दाव्याचे साक्षी म्हणून जनतेने दाताळा पूल, बीजेएम कॉन्व्हेंट मागे इरई पात्र बघण्याकरिता पर्यटन म्हणून यावे असे कुशाब कायरकर यांनी आवाहन केले आहे.
