विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrpur) : धारण प्रदूषण आणि केवळ ०४ दिवस समाधान कारक प्रदूषण आढळले. आधीच प्रदुषित असलेल्या चंद्रपुर मध्ये मार्च महिन्यात प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी दिली
मागील जानेवारी महिन्यात सर्व दिवस प्रदूशीत होते आणि फेब्रुवारी महिन्यात सुध्दा सर्व दिवस प्रदूषशीत होते. त्याही पेक्षा जास्त प्रदूषण मागील मार्च महिन्यात आढळले. ह्या महिन्यात ९ दिवस तर अत्यंत खराब प्रदूषण आढळले. आणि १८ दिवस सुद्धा जास्त प्रमाणात प्रदूषण होते. महिन्यातील २६ दिवस धूलिकण १० मायक्रो मीटर तर ५ दिवस २.५ मायक्रो मीटर आकाराचे सुक्ष्म धुलीकनाचे प्रदूषण होते ते पाहता हे वाढलेले प्रदूषण हे नियम न पाळता चुकीच्या पद्धतीने रस्ते खोदल्यामुळे झालेले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून हेच लक्षात येते.
विशेष म्हणजे सुक्ष्म धूलिकनाचे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे, नागरिकाना जो नाहक त्रास झाला आणि आरोग्यासाठी धोकादायक प्रदूषण वाढले यासाठी प्रशासनाला जिम्मेदार धरून नागरिकांना मोफत औषध उपचार दिले गेले पाहिजे अशी मागणी पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यानी केली.
शहरातील प्रदूषण निर्देशांक
– ० – ५० AQI (Good) निर्देशांक आरोग्यासाठी चांगला मानला जातो.असा एकही दिवस नव्हता
– ५१-१०० AQI ( Satisfactory) निर्देशांक हा समाधानकारक प्रदूषण मानले जाते. असे येथे ०४ दिवस आढळले
– १०१ – २०० AQI ( Moderate) निर्देशांक प्रदूषित श्रेणीत येतो. असे येथे १८ दिवस आढळले
– २०१- ३०० AQI (Poor) निर्देशांक असून जास्त प्रदुषित मानला जातो. असे ०९ दिवस आढळले.
प्रदूषनाची कारणे
वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघनारा धूर, धूळ, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम, स्थानिक थर्मल पॉवर उद्योग, इत्यादी अनेक कारणांमुळे सर्वत्र प्रदूषनात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. चंद्रपुर शहरात अलीकडे शासकीय विकासकामे, विविध बांधकाम, रस्ते बांधणे सुरू असते त्यातच वाहनाच्यामोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते.
चंद्रपुर शहर हे राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम अंतर्गत प्रदूषित शहराच्या यादीत मोडत असून येथे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण करण्याची मनाई आहे. असे असताना बांधकाम कंपनी ला पर्यावरण समधी विविध अटी घालायला पाहिजे. चंद्रपुर च्या मागील ३ महिन्या पासून सुरू असलेल्या चुकीच्या पद्धतीने रस्ते खोदकाम केल्या मुळे प्रदूषणात भर पडली आहे. शहरात कुठलेही बांधकाम रात्री करावे, लोकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून दिवसा पाणी शिंपडावे.
प्रदूषणामुळे रोगराईत वाढ
प्रदूषणामुळे आधिच श्वसनाच्या रोग् असणाऱ्या ना हानिकारक असते, तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात. दमा, ब्रॉकाय टिस, टीबी, हृदय रोग आणि मानसिक रोग वाढतात,
प्रदूषण नियंत्रण कसे होणार
प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे, चांगले आणि स्वच्छ रस्ते ठेवणे, शहरात सायकल चा उपयोग वाढविणे, बेटरी वर चालणारी वाहने वाढविणे, सार्वजनिक वाहने वापरने, वाहनांच्या संख्येत घट करणे, कचरा न जाळणे, उदयोगांणी प्रदूषण रोखणे, नागरिकांनी सुद्धा प्रदूषण होऊ नये अश्या उपाययोजना करणे, स्मोग टॉवर्स, फॉग मशीन किंवा कृत्रिम पाऊस हे तात्पुरते उपाय आहेत. प्रशासनाणे कडक उपाय योजना राबऊन प्रदूषण स्रोत कमी करावे तरच प्रदूषनावर नियंत्रण होऊ शकेल.
