Latest Posts

चंदनसिंह चंदेल यांचा वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

– १० महिला सह १२५ जणांनी केले रक्तदान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : ७ एप्रिल रोजी भाजपा ज्येष्ठ नेते तथा माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसानिमित्त एकदंत लॉन, बल्लारपूर येथे रक्तदान जीवन – दिन समिती, बल्लारपूर यांच्यामार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १० महिला सहित १२५ जणांनी रक्तदान केले.

एप्रिल आणि मे महिन्यात वाढत्या तापमानामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सर्व समाजातील लोकांनी स्वेच्छेने रक्तदानात सहभाग घेतला. स्त्री – पुरुषांसह एकूण १२५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या व समाजाच्या कल्याणासाठी आपले कर्तव्य पार पाडले.

या रक्तदान शिबिराचे आयोजन चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी केले होते.

समितीचे प्रमुख विश्वजीत चंदेल, ऍड. रणंजय सिंह, गोगी दारी, देवा वाटकर, सतीश कनकम, अजहर शेख, किशोर मोहुर्ले व रक्तदान जीवनदान समिती, बल्लारपूरचे सर्व सदस्य यांनी सर्व रक्तदाते व हितचिंतकांचे आभार व्यक्त केले.

Latest Posts

Don't Miss