Latest Posts

चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसानिमित्त ७ एप्रिल ला रक्तदान शिबिर चे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान सेवा समिती बल्लारपूर यांच्या वतीने सोमवार, ७ एप्रिल रोजी स्थानिक एकदंत लॉन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताची मोठी कमतरता भासत आहे. सरकारी रुग्णालये आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्त उपलब्ध नाही. बाहेरून रक्त आणले जात आहे. जिल्ह्यात रक्ताची अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. रक्तदान करूनच गरजू रुग्ण किंवा जखमीला जीवनदान मिळू शकते. ही परिस्थिती पाहता दरवर्षी चंदनसिंह चंदेल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.

सर्व इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात सक्रिय सहभाग घ्यावा व रक्तदान करून मानवसेवेच्या या कार्यात आपले मोलाचे योगदान द्यावे. असे आवाहन रक्तदान सेवा समितीने केले आहे.

Latest Posts

Don't Miss